रस्ते सिमेंट काँक्रिटच्या कामाचे पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते भूमिपूजन
पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन) दि. 18 – पूर्णानगर प्रभाग क्रमांक 11 मधील परिसरातील विविध विकास कामांच्या भुमिपूजनाचा धडाका सुरु करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे प्रभाग अकरा मधील पूर्णानगर परिसरातील रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचा रस्ता या प्रमुख कामांचे भूमिपूजन महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला.
क्रीडा समितीचे सभापती संजय नेवाळे, नगरसेविका योगीता नागरगोजे, भिमा बोबडे, गोरख पाटील, अतुल माने, निलेश सुंभे, संतोष ठाकुर तसेच येथील स्थानिक नागरिक आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पूर्णानगर परिसरातील या रस्त्यांमध्ये नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथ, वाहनांना पार्किंग व्यवस्था, नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस,डस्टबीन, असे स्मार्ट कॉंक्रीट रस्ते प्रभाग ११ मधील मधील नागरिकांना लवकरच पाहायला व अनुभवायला मिळतील.
एकनाथ पवार म्हणाले कि, शहराच्या परिपूर्ण विकासासाठी आवश्यक सुविधा देण्याचा आमचा भर आहे, आम्ही सत्तेत आल्यापासून सबका साथ सबका विकास या घोषणेप्रमाणे काम करीत असून प्रत्येक प्रभागात आम्ही कामे केली आहेत व करीत आहोत. पिंपरी चिंचवड शहरातील जनतेने आम्हाला भरभरुन प्रेम दिले आहे. त्याच्यामुळेच आम्ही आज येथे आहोत. त्यामुळे सर्वाना आम्ही सोबत घेऊनच काम करीत आहोत व सर्वांच्या शाश्वत व समग्र विकास होण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे सांगितले.
दरम्यान, प्रभागातंर्गत होणाऱ्या विकास कामांमधून नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील. असा विश्वास पक्षनेते पवार यांनी व्यक्त केला.